amit shaha and sivraj singh chovhan  sakal
देश

BJP Crisis: CM शिवराजसिंह चौहानांविरोधातील असंतोष दूर करण्यासाठी खुद्द अमित शाहा मैदानात!

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधातील असंतोषाचा फटका आता भाजपला या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसून आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील रणनीतीची सूत्रे हातात घेतली आहे. त्यांनी आज ग्वाल्हेरमधील जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन प्रचाराची पुढील दिशा कशी राहील, यावर मार्गदर्शन केले.

मध्य प्रदेशमध्ये मतदान येत्या १७ नोव्हेंबरला असून येथे पहिल्यांदाच भाजपला एवढ्या मोठ्या असंतोषाला भाजपला सामोरे जावे लागत आहे. ग्वाल्हेर आणि चंबळ या भागात एकूण ३४ विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रभाव असल्याचे मानला जाते.

गेल्या निवडणुकीत या भागात काँग्रेसला २६ जागांवर विजय मिळाला होता. या भागावर प्रभाव असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही भाजपची स्थिती येथे फारशी सुधारलेली दिसून आलेली नाही. उलट अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या आवाहनानंतरही संपलेली नाही.

ही स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण प्रचारात सहभागी व्हावे, छोटेमोठे मतभेद बाजूला करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री शहा कार्यकर्त्यांना करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT