kamalnath imrati devi.jpg 
देश

कमलनाथ यांचे माजी मंत्री इमरती देवींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, शिवराज चौहान यांचे मौनव्रत

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांची खिल्ली उडवत त्यांना 'आयटम' असे संबोधल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कमलनाथ हे डबरा येथील प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, 'त्या कोण आहेत, मी त्यांचं नाव का घेऊ...तुम्ही मला सावध करायला हवं होतं...काय आयटम आहे.' कमलनाथ यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आणि या विरोधात दोन तास मौनव्रत धारण करणार असल्याचे सांगितले. 

प्रचारसभेत बोलताना कमलनाथ म्हणाले की, सुरेश राजे हे आमचे उमेदवार आहेत. ते अत्यंत सरळ स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत. काय आहे त्यांचं नाव ? असे म्हणताच सभेतील गर्दीतून इमरती देवी यांच्या नाव आले. तेव्हा कमलनाथ यांनी मी त्यांचं नाव का घेऊ, तुम्ही माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवं होतं...हे काय आयटम आहे...हे काय आयटम आहे, असे कमलनाथ यांनी म्हटले. 

इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या आहेत. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इमरती देवी या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसचा त्याग करत भाजपत प्रवेश केला आहे. त्या आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 

दरम्यान, कमलनाथ यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान नाराज झाले आहेत. इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ते दोन तास मौन राखणार आहेत. ते आज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मौनव्रत धारण करणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT