देश

उदयनराजेंनी अखेर हातात घेतले कमळ; शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला.

उदयनराजेंनी विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत दिल्लीत प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आज पूर्णविराम मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. आज जाणार, उद्या जाणार अशा चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व आमदर शशिकांत शिंदे उपस्थित होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत राहतील अशा चर्चा सुरू झाल्या; परंतु अवघ्या काही तासांतच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या गोटातून बाहेर आले. 

शुक्रवारी त्यांनी ट्विटरवरून भाजपत प्रवेश करत असल्याचे अधिकृत जाहीर केले. विकासासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या ट्विटरला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना टॅग केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील दोन्ही राजे पुन्हा एकाच पक्षात राहणार हे स्पष्ट झाले.  उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा सोडून उदयनराजेंना घेऊन दिल्ली गाठली. शुक्रवारी रात्री ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. अखेर आज सकाळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT