Mughal Food History esakal
देश

Mughal Food History : मटण, चिकन, मासे या गोष्टींऐवजी मुघलांच्या मुदपाकखान्यात शिजायची ही गोष्ट

मुघलांच्या शाही जेवणाबद्दल बऱ्याच साऱ्या समजुती

सकाळ डिजिटल टीम

Mughal Food History : मुघलांच्या शाही जेवणाबद्दल बऱ्याच साऱ्या समजुती आहेत. जसं की त्यांच्या मुदपाकखान्यात मटण, चिकन, मासे शिजत असतील, त्यांना ते आवडत असतील. पण इतिहासात नोंद असलेल्या काही गोष्टींवरून समजतं की मुघल सम्राटांना शाकाहारी आणि अनेक भारतीय पदार्थांची विशेष ओढ होती. असे अनेक सम्राट होते ज्यांनी हळूहळू स्वतःला मांसाहारापासून दूर केलं. विशेष म्हणजे अकबराला शिकारीची आवड होती, पण त्याला मांसाहार अजिबात आवडत नव्हता.

मुघलांच्या काळात जेवणावर अनेक प्रयोग झाले. त्या प्रयोगांमुळे देशाला असे अनेक पदार्थ मिळाले जे जगभर प्रसिद्ध आहेत. अन्न तज्ञ आणि इतिहासकार सलमा हुसैन यांनी अनेक पुस्तके लिहिली ज्यात मुघल काळातील खाद्यपदार्थांचा उल्लेख केला आहे. जाणून घेऊ की मुघल सम्राटाच्या शाही स्वयंपाकघरात कोणते पदार्थ बनवले जायचे आणि त्यांना काय आवडायचं.

शाकाहारी पदार्थांची ओढ

अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांच्यात एक समानता काढायची म्हटलं तर ती म्हणजे तिघांनाही पालेभाज्या आणि भाज्यांची विशेष आवड होती. मुघल काळात, असं म्हटलं जात होतं की शारीरिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी मांस आवश्यक आहे, म्हणूनच काहीवेळा सम्राटाच्या अन्नात मांसाहाराचा समावेश केला जायचा. मुघलांच्या सुरुवातीच्या काळात, विशेषत: शुक्रवारी मांसाहार केला जायचा पण हळूहळू त्याची जागा रविवारने घेतली.

मुघल मुदपाकखाना तीन भागात विभागलेला

अबुल फझल याने अकबराच्या राजवटीतील सर्व गोष्टी इतिहासात नोंदवल्या आहेत. त्यानं ऐन-ए-अकबरीमध्ये लिहिलंय की बादशहाचे शाही स्वयंपाकघर तीन भागात विभागले गेले होते. पहिल्या भागात, शाकाहारी जेवण बनायचं, त्याला सुफियाना भोजन म्हणत.

दुसऱ्या भागात कडधान्य, अन्नधान्यांपासून स्वयंपाक तयार केला जायचा. तर तिसर्‍या भागात तूप आणि मसाले घालून मांस शिजवलं जायचं. यावरून असं दिसून येतं की मुघलांना कडधान्ये, भाजीपाल्याची विशेष आवड होती. स्वयंपाकघरातील या प्रकारावरून त्यांचा शाकाहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक होता हे दिसून येते.

जेव्हा अन्न प्रयोग सुरू झाले

मुघलांचा शाकाहारी अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून त्यांच्या स्वयंपाकींनी अनेक प्रयोग सुरू केले. भाज्यांसह विविध प्रकारचे पदार्थ बनवले जाऊ लागले. भाज्या आणि पुलाव यांच्यावर प्रयोग सुरू झाले. यात अजिबात मांस नसायचे. औरंगजेबाला खिचडीची विशेष ओढ असल्याच ऐतिहासिक कागदपत्रांवरून दिसून येत.

आपल्या मुलाने लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाने खासकरून सोलोमन या स्वयंपाक्याची मागणी केली होती. हा स्वयंपाकी खिचडी आणि बिर्याणीमध्ये पारंगत होता. ताजी फळं आणि त्यातल्या त्यात आंबे औरंगजेबाला खूप आवडायचे. पनीर कोफ्ता आणि जेवणात फळांचा वापर ही औरंगजेबाची देणगी असल्याचं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT