Mukesh Ambani gift to his longtime employee Manoj Modi 1500 crore house know details  
देश

Mukesh Ambani : निष्ठावान सहकाऱ्याला अंबानींचं जम्बो गिफ्ट! दिलं १५०० कोटींचं घर

रोहित कणसे

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचं हृदय देखील तेवढचं मोठं असल्याची सध्या चर्चा होतेय. खूप काळापासून रिलायंस इंडस्ट्रीजचे कर्मचारी आणि जवळचे सहकारी मनोज मोदी यांना आलीशान घर गिफ्ट केलं आहे. या घराची किंमत १५०० कोटी असून या घराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

मनोज मोदी रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वात विश्वासू कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि त्यांना मुकेश अंबानी यांचे राइट हँड म्हणून देखील ओळखले जाते. प्रॉपर्टी वेबसाइट मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टनुसार मनोज मोदी यांना जे घर गिफ्ट म्हणून देण्यात आलं आहे ते २२ मजली इमारत आहे. इतकेच नाही तर ही इमारत प्राइम लोकेशन नेपीन सी रोडवर आहे.

हेही वाचा - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या रिपोर्टनुसार काही महिन्यापुर्वी मुकेश अंबानी मनोज मोदी यांना ही इमारत भेट म्हणून दिली आहे. काही दशकांपासून रिलायंस समूहाचा भाग असलेले मनोज मोदी सध्या रिलायंस जिओ आणि रिटेलचे डायरेक्टर आहेत. तसेच मुकेश अंबानींनी गिफ्ट दिलेल्या या इमारतीला व़ंदावन असे नाव देण्यात आले आहे.

हे घर ज्या रोडवर आहे तेथे जिंदल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सज्जन जिंदल देखील राहतात. त्यांच्या घराचं नाव माहेश्वरी हाउस आहे. ही प्रॉपर्टी ज्या नेपीन सी रोडवर आहे तेथे जमीनीचे भाव ७०,६०० स्क्वेअर फुट इतका आहे. मनोज मोदी यांच्या या इमारतीची किंमत १५०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

किंमत इतकी का आहे?

या इमारतीचा प्रत्येक फ्लोअर ८,००० स्क्वेअर फुट आहे. या इमरतीचे क्षेत्र १.७ लाख स्क्वेअर फुट आहे. या इमारतीच्या पहिल्या ७ मजल्यावर कार पार्किंग साठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तर या इमारतीतील काही फर्निचर हे इटलीहून मागवण्यात आलं आहे.

नुकचेच मनोज मोदी यांनी मुंबईतील आपले दोन अपार्टमेंट विकले आहेत. ज्याच्या डॉक्युमेंटवरून त्यांच्या किंमत ४१.५ कोटी रुपये होती. हे दोन्ही अपार्टमेंट महालक्ष्मी येथे होते. दरम्यान मुकेश अंबानी यांनी मोदी यांनी भेट दिलेल्या घराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT