Mukesh Ambani File Photo
देश

मुकेश अंबानींचा जिओनंतर नवा बिझनेस; ५ वर्षांत अख्या 'रिलायन्स'ला टाकेल मागे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने नुकतीच फॉर्च्यून 500 यादीत 51 स्थानांनी प्रगती करत 104 वे स्थान पटकावले आहे. भारतातील सरकारी कंपनी एलआयसी नंतर या यादीत सामील होणारी रिलायन्स ही दुसरी कंपनी आहे. पण आता रिलायन्सला आणखी एका कंपनीचे आव्हान मिळणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांत ही कंपनी अख्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकेल, असं सांगण्यात येत आहे. मात्र रिलायन्सला मागे टाकणारी कंपनी खुद्द मुकेश अंबानी यांचीच असेल.

रिलायन्सला जिओ किंवा रिलायन्स रिटेल नव्हे तर तिसरीच कंपनी मागे टाकू शकते. याबाबत खुद्द मुकेश अंबानी यांनीच दावा केला आहे. अंबानी यांनी म्हटलं की, येत्या ५ ते ७ वर्षांत ग्रीन एनर्जी व्यवसाय हा सर्वात फायदेशीर व्यवसाय बनेल.

मुकेश अंबानींचा हा दावा विश्वास ठेवण्यायोग्य आहे. कारण ते नेहमीच नवीन व्यवसाय उभारून त्या व्यवसायाला इतर कंपन्यांच्या पुढं नेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. 2016 मध्ये जिओ लाँच करून त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवली होती. आज जिओ टेलिकॉम क्षेत्रात आघाडीवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक बोली लावून, Jio ने टेलिकॉम क्षेत्रात नवीन उंची गाठण्याचा बिगुल वाजवला आहे.

आता मुकेश अंबानी ग्रीन एनर्जी क्षेत्रात ६ लाख कोटींची गुंतवणूक करून या उदयोन्मुख क्षेत्राचे सम्राट होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सज्ज झाले आहेत. कंपनी पुढील 1 वर्षात हा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत आहे. या नवीन ऊर्जा क्षेत्रातील क्षमता विस्तारासाठी कंपनीने 5,500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक पूर्ण केली आहे. तसेच कंपनीने गेल्या वर्षीच जाहीर केले होते की, पुढील तीन वर्षांत ग्रीन एनर्जीमध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT