Mukhtar Ansari Died esakal
देश

Mukhtar Ansari Death Reason : स्लो पॉइझन की हार्ट अटॅक, कसा झाला मुख्तार अन्सारीचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 'हे' कारण आलं समोर

Mukhtar Ansari Death Reason : गँगस्टरपासून राजकारणी बनलेल्या मुख्तार अंसारीचे नुकतेच निधन झाले आहे. यानंतर त्याच्या मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या

रोहित कणसे

Mukhtar Ansari Death Reason : गँगस्टरपासून राजकारणी बनलेल्या मुख्तार अंसारीचे नुकतेच निधन झाले आहे. यानंतर त्याच्या मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता अंसारी याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. ६० हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी असलेला मुख्तार अंसारी उत्तर प्रदेशातील बांदा येथील जेलमध्ये बंद होता. बुधवारी रात्री अचानक त्याची तब्यत बिघडल्याने त्याला राणी दुर्गावती मेडिकल काँलेजमध्ये भरती करण्यात आले, जेथे रात्री उशीरा हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला.

मेडिकल काँलेजचे प्राचार्य सुनील कौशल यांनी अंसारीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचे स्पष्ट केले होते. आता अंन्सारीच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमधून देखील त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक (मायोकार्डिअल इन्फार्क्शन) असल्याचे समोर आले आहे.

डॉक्टरांनी अंसारीच्या कुटुंबाकडून केला जाणारा दावा फेटाळला आहे. पोस्टमॉर्टमच्या आधारे, मुख्तार अन्सारीवर स्लो पॉयझनिंग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमधील पाच डॉक्टरांच्या पॅनलने मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. यावेळी मुख्तार अन्सारी यांचा धाकटा मुलगा उमर अन्सारी देखील उपस्थित होता.

पोस्टमार्टमनंतर शुक्रवारी संध्याकाळी मुख्तार अंसारीचा मृतदेह गाझीपूर येथे पाठवण्यात आला. कुटुंबियांच्या मते शनिवारी सकाळी गाझीपूरच्या मोहम्मदाबाद येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूवर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बांदा तुरुंगात त्यांना 'स्लो पॉयझन' दिल्याचा आरोप अन्सारीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर बांदा मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) भगवान दास गुप्ता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या प्रकरणाच्या चौकशीसाठी गरिमा सिंग यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT