mukhtar ansari 
देश

योगी सरकारचा मोठा विजय; बाहुबली अन्सारीला पंजाबमधून यूपी तुरुंगात पाठवण्याचा कोर्टाचा आदेश

सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी गँगस्टर आणि नंतर नेता बनलेल्या मुख्तार अन्सारीला दोन आठवड्याच्या आत पंजाबमधून उत्तर प्रदेश तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आहे. अन्सारीवर यूपीमध्ये खटला चालावा यासाठी कोर्टाने हा आदेश दिला आहे. सध्या बाहुबली नेता पंजाबच्या रोपड तुरुंगात आहे. आता प्रयागराजचे विशेष कोर्ट ठरवेल की, अन्सारीला बांदा तुरुंगात ठेवण्यात येईल किंवा अन्य कोणत्या तुरुंगात. जस्टिस भूषण आणि आर सुभाष रेड्डी यांच्या पीठाने निर्देश दिलाय की अन्सारीला दोन आठवड्यांच्या आत यूपी सरकारला सुपूर्द केले जावे. याआधी सुप्रीम कोर्टाने दोन ट्रान्सफर याचिकांना सीझ केले होते.ज्यातील एक यूपी सरकारकडून अन्सारीला पंजाबमधून यूपीमध्ये ट्रान्सफर करण्याची याचिका होती आणि दुसरी अन्सारीने आपल्या विरोधातील खटला दिल्लीत ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने अन्सारीच्या याचिकेला फेटाळून लावले आहे. 

आमदार अन्सारी यूपीतील एका तुरुंगात कैद होता आणि त्याच्याविरोधात खटला सुरु होता. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याच्याविरोधात वसुली आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रोडक्सन वॉरंट मिळवलं होतं आणि त्याला पंजाबमध्ये आणलं होतं. गँगस्टर अन्सारीवरुन यूपी आणि पंजाप सरकारमध्ये वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे योगी सरकारचा विजय झालाय.

उत्तर प्रदेश सरकारकडून कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 3 मार्चला सुनावणीदरम्यान सांगितलं की, अन्सारी पंजाबच्या रोपड तुरुगांतून आपले काळेधंदे करत आहे. पंजाब पोलिसांनी ज्या एफआयआरच्या आधारावर मुख्तार अन्सारीला अटक केली, त्यामध्ये इन्सारीचे नावे स्पष्टपणे लिहिण्यात आलेले नाही. तसेच मॅजिस्ट्रेटचे निर्देश नसताना बांदा तुरुंग अधीक्षकाने सोपवल्यानंतर पंजाबमध्ये त्याला घेऊन जाण्यात आले. 

मुख्तार अन्सारीला गेल्या काही काळापासून पंजाबमधून यूपी तुरुंगात पाठवण्याबाबत रस्सीखेच सुरु होती. मुख्तारने यूपी जेलमध्ये स्वत:च्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. शिवाय पंजाबच्या रोपड तुरुंग प्रशासनाने मुख्तारच्या ट्रान्सफरसाठी अनेक अडचणी आणल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकार याप्रकरणासाठी सुप्रीम कोर्टात पोहोचली होती. सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याने योगींचा मोठा विजय झाल्याचं मानलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT