Gujrat ATS Sakal
देश

Mumbai 1993 Serial Blasts : आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात विविध ठिकाणी 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी 23 मे रोजी सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.

अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे असून, या चारही आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती, त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या सर्व आरोपींना सा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या चौघांना बनावट पासपोर्टच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींकडे सविस्तर चौकशी केली असता, ते 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपी असल्याचे समोर आले त्यांनतर या सर्वांना अटक करण्यात आली, असे गुजरात एटीएसचे डीआयजी दीपन भद्रन यांनी सांगितले. मुंबईतील या साखळी बॉम्बस्फोटात विविध ठिकाणी 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT