Supreme Court 
देश

#AareyForest 'आरे'तील वृक्षतोड नको रे; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. 

आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) सकाळी दहा वाजता सुनावणी झाली. 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलनकर्त्या 29 जणांना मुंबईतील न्यायालयाने रविवारी जामीन मंजूर केला आहे. त्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरे वसाहतीतील 2400 झाडे कापण्यात आली होती. सर्वाच्च न्यायालयाने वृक्षतोड थांबविण्याचा निर्णय देत आरेतील वृक्षतोड व्हायला नको होती, असे म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी आरे वसाहतीची नाकाबंदी करून अधिक काळापासून झाडे कापणे सुरूच होती. ही झाडे कापताना 48 तासांपासून नागरिकांकडून विरोध करण्यात येत होता. "आरे'त संचारबंदी लागू करून वाहनांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे "आरे'त आजही तणावपूर्ण वातावरण होते. 

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सकाळी मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी झाडे कापण्याला विरोध करणाऱ्या दोन याचिका फेटाळल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या भागातील झाडे कापण्यास सुरवात केली. ती रविवारी रात्रीपर्यंत अविरत सुरू होती. शुक्रवारी झाडे कापण्याची सुरवात झाल्याचे समजताच तेव्हापासून स्थानिक आदिवासी पर्यावरणप्रेमी 'आरे'मध्ये येऊन आंदोलन करत आहेत. शनिवारी पाहाटेपासून आंदोलन वाढू लागल्यावर पोलिसांनी संचारबंदी लागू करून संपूर्ण परिसर सील केला होता. रविवारीही संचारबंदीतच झाडे कापली जात होती. आरे वसाहतीत येणारे सर्व प्रवेशमार्गांवर नाकाबंदी करून बाहेरील नागरिकांना अडवले जात होते. तरीही पोलिसांना चकमा देऊन मोठ्या संख्येने नागरिक, स्थानिक आदिवासी कारशेडच्या परिसरात आंदोलन, निदर्शने करत विरोध दर्शवत होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आरे वसाहतीत येऊन या कृत्याचा विरोध केला होता.  आता ही वृक्षतोड थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT