bhai jagtap meet rahul gandhi sakal media
देश

राहुल गांधी पहिल्यांदाच येणार 'शिवाजी पार्क'वर? भाई जगताप यांचं निमंत्रण

काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर राहुल गांधी यांच्या 12 तुघलक लेन येथील निवासस्थानी ही भेट झाली.

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आज राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली. येत्या २८ डिसेंबर रोजी कॉंग्रेस स्थापना दिवसानिमित्त त्यांना मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण जगताप यांनी दिले आहे. यामुळे राहुल गांधी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर राहुल गांधी यांच्या 12 तुघलक लेन येथील निवासस्थानी ही भेट झाली. भाई जगताप यांच्याशी याबाबत सकाळने संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिवस आहे. त्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे निमंत्रण राहुल यांना दिले आहे. त्या‌साठी ही भेट होती. स्थापना दिवसाचा कार्यक्रम सकाळी दिल्लीत असतो. त्यानंतर मुंबईत कार्यक्रमास येण्याची विनंती त्यांना केली आहे.’’

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर काँग्रेस स्थापना दिवसाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शिवाजी पार्कवर येऊन गेले आहेत. पण राहुल गांधी अद्याप तिथे आलेले नाहीत. त्यांनी काँग्रेस स्थापना दिवशी शिवाजी पार्कवर येण्याचा नक्की प्रयत्न करू, अशी सकारात्मकता त्यांनी दाखवली आहे, असे जगताप यांनी सांगितले.

राहुल गांधी शिवाजी पार्कवर आल्यास त्यांचा या स्थळी हा पहिला कार्यक्रम असेल. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. त्याबद्दल कोणतेही वक्तव्य भाई जगताप यांनी केलेले नाही. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे का, या प्रश्‍नावर भाई जगताप म्हणाले, ‘‘आम्ही परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. त्यामुळे परवानगीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्याकडून परवानगी नाकरण्यात आली, तर आम्ही न्यायालयात जाऊन परवानगी आणू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT