IndiGo flight esakal
देश

Flights Cost : मुंबई-दिल्ली विमान प्रवास महागला; तिप्पटीने वाढ झाल्याने प्रवासी हैराण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई-दिल्ली विमान प्रवासाच्या काही विशिष्ट तिकिटांच्या किमती १४ ते ३७ हजार रुपयांपर्यंत जात असल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

एरवीच्या दरापेक्षा तिप्पट दराने ही तिकिटे विकली जाण्याचा हा कल फक्त मुंबई-दिल्ली मार्गावरच नव्हे तर अन्य आखाती देशातील विमान तिकिटांबाबतही दिसून येत आहे. मुंबई दिल्ली हा मार्ग सर्वांत गर्दीचा मानला जातो.

एरवी त्याचे एका मार्गाचे इकॉनॉमी वर्गाचे तिकीट पाच ते सात हजार रुपयांच्या घरात असते. मात्र सध्या सर्वच कंपन्यांनी विमानांची संख्या कमी केल्यामुळे नॉनस्टॉप विमान प्रवासासाठी तातडीने तिकीट हवे असल्यास या तिकिटांच्या किमती १५ हजार रुपयांच्या वर गेल्यामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत. बिझनेस क्लासची तिकीटही एरवी पंचवीस हजारांच्या घरात असतात. त्यांची किमतही आता ३५ हजार रुपयांच्या वर गेली आहे.

सप्टेंबर २०२२ पासून सरकारने विमान तिकिटांच्या किमतीवरील निर्बंध उठवल्याने देखील दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही विमान कंपन्यांनी इंधन आणि खर्चातील वाढीचे कारण देऊनही तिकिटांची भाववाढ केली आहे.

अर्थात ही महागडी तिकिटे सदा सर्वकाळ नसून विशिष्ट वेळच्या विमानांसाठी व तातडीच्या आरक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. गर्दीच्या वेळा सोडून अन्य वेळेत विमान प्रवासासाठी काही प्रवासी कंपन्यांच्या साईटवरून तिकिटे काढल्यास पाच ते सात हजार रुपयांपर्यंत ही तिकिटे मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT