beglaum esakal
देश

मुंबई कर्नाटकचे नामांतर; कर्नाटक सरकारने केली घोषणा

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीसुद्धा याबाबतची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीसुद्धा याबाबतची घोषणा केली आहे.

बेळगाव - मुंबई कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलण्यात आल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. यापुढे हा प्रदेश कित्तुर कर्नाटक अशा नावाने ओळखला जाईल अशी माहिती कर्नाटकचे कायदे आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीसुद्धा याबाबतची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सातत्यानं सीमा वाद निर्माण होत आहे. त्यामुळे आता जुनी नावे ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे या प्रांताचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या दरम्यान त्यांनी याबाबतची घोषणा केली. राज्याच्या निर्मितीच्या वर्धापनदिनानिमित्त राज्योत्सव साजरा केला जातो.

नुकतंच हैदराबाद कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलून ते कल्याण कर्नाटक केलं होतं. तसंच नाव बदलामागे कारण म्हणजे कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतर सीमा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे वाद सोडवण्याचा प्रयत्नही झाला मात्र आता पुन्हा हे वाद डोके वर काढत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते.

भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, हैद्राबाद प्रांत असे वेगवेगळे प्रांत होते. यापैकी मुंबई प्रांतांमध्ये सध्याच्या कर्नाटकातील बेळगाव, कारवार, धारवाड व विजापूर हे चार जिल्हे होते. त्यामुळे या भागाला मुंबई कर्नाटक म्हणून ओळखले जाते. 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यानंतर कर्नाटक राज्याची निर्मिती झाली नव्हती. तसेच या राज्याला म्हैसूर राज्य म्हणून ओळखले जात होते. 1971 मध्ये म्हैसूर राज्याचे नाव कर्नाटक असे करण्यात आले.

मुंबई प्रांतातील बेळगाव व कारवार जिल्ह्यात मराठी भाषिकांचे प्रमाण जास्त आहे. तरीसुद्धा हा भाग कर्नाटकात समाविष्ट केल्यानं सीमाभागात मराठी भाषिक लढा देत आहेत. तब्बल 865 गावे महाराष्ट्रात सामील करावीत यासाठी लढा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT