KS Ishwarappa KS Ishwarappa
देश

मंत्री म्हणाले, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येमागे मुस्लिम

सकाळ डिजिटल टीम

शिंपी म्हणून काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखा बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा (२६) याची अज्ञात व्यक्तींनी खून (Murder) केला. त्याच्या हत्येनंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. या हत्याकांडात मुस्लिम गुंडांचा हात असल्याचा आरोप कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी सोमवारी केला. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येने (Murder) मी अत्यंत व्यथित झालो आहे. त्याला मुस्लिम गुंडांनी मारले. मी आता परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी शिवमोग्गा येथे जात आहे, असे पत्रकारांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एनआयए चौकशीची मागणी केली आहे.

प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोषींना लवकरात लवकर अटक केली जाईल. पोलिस अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी लोकांना शांत राहण्याची विनंती करतो, असे हत्येवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सीएम बसवराज बोम्मई यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

शिवमोग्गामध्ये सध्या सर्वकाही नियंत्रणात आहे. बंगळुरू येथून आणखी २०० पोलिस पाठवण्यात आले आहेत. १२०० आधीच तैनात आहेत. आरएएफ देखील तेथे उपस्थित आहे. आम्ही इतर जिल्ह्यांच्या एसपींनाही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तीन जणांना अटक केली आहे. या हत्येत पाच जणांचा सहभाग आहे, असे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

दोन-तीन दिवस काळजी घ्यावी लागेल

आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना परिस्थितीचे विश्लेषण करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. दोन ते तीन दिवस काळजी घ्यावी लागेल, असे कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनासह दिवसभरातील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT