muslim girls can marry at age of 16 punjab and haryana hc upholds the-marriage of minor  
देश

मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, HC चा महत्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Muslim Girl marriage age : भारत सरकारने महिलांचे लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्षे केले आहे, परंतु मुस्लिम मुलीच्या लग्नाशी संबंधित एका प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवीन वाद सुरू होण्याची शक्याता आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने प्रेमविवाह प्रकरणात 16 वर्षीय मुस्लिम मुलीचा विवाह कायदेशीररित्या वैध ठरवला आहे. 16 आणि 21 वर्षे वयाच्या मुस्लिम जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून संरक्षण देत, उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करू शकते.

न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांच्या एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने पठाणकोटमधील एका मुस्लिम जोडप्याच्या याचिकेवर हा आदेश दिला. या जोडप्याने कुटुंबियांपासून संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली होती. “केवळ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यामुळे, त्यांना भारतीय राज्यघटनेत नमूद केल्यानुसार त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही,” असे खंडपीठाने म्हटले आहे.

इस्लामिक शरिया नियमांचा हवाला देत न्यायमूर्ती बेदी म्हणाले की, मुस्लिम मुलीचे लग्न मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार चालते. "सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या 'प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मडन लॉ' या पुस्तकातील कलम 195 नुसार, याचिकाकर्ता क्रमांक 2 (मुलगी) 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्याने ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करार करू शकते. याचिकाकर्ता क्रमांक 1 (मुलगा) 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारे, दोन्ही याचिकाकर्ते मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करण्यायोग्य वयाचे आहेत," असे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने हे देखील मान्य केले आहे की, याचिकाकर्त्यांच्या भीतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे या वस्तुस्थितीकडे डोळे झाक करता येणार नाही. त्यांनी एसएसपी पठाणकोट यांना या जोडप्याला योग्य सुरक्षा देण्याचे आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह 8 जून 2022 रोजी मुस्लिम संस्कार आणि समारंभानुसार पार पडला. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला आहे आणि त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय लग्न न करण्याची धमकी या जोडप्याला दिल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Driverless Car Photos : टेस्ला, क्रुज सारख्या कंपन्या मागे पडल्या; बंगळुरूमध्ये बनली भारतातली पहिली ड्राइवरलेस कार, पाहा फोटो

Love Affair Crime : पहिली भेट ते संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हत्या; अमृतानं रामकेशला कसं आणि का संपवलं? वाचा A to Z स्टोरी

Sindhudurg Tragedy : Video करून तरूणाने घेतला गळफास, पत्नी नातेवाईकांच्या हाती लागलेल्या व्हिडिओत धक्कादायक बाबी समोर

Madhya Pradesh : आता मध्य प्रदेशातील सर्व शासकीय भरतींसाठी एकसमान परीक्षा प्रणाली लागू होणार, CM यादव यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरात फुट

SCROLL FOR NEXT