funeral Sakal
देश

देशभर दंगे, काश्मीरात सलोखा; हिंदू जवानाच्या पार्थिवाला मुस्लिमांनी दिला खांदा, अनोखा आदर्श ठेवला

मुस्लीमांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची सुद्धा व्यवस्था केली व हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर, ता. ३१ : कुलगाम जिल्ह्यातील करकन गावात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम नागरिकांनी पुढाकार घेतला. बलबीर सिंग असे त्यांचे नाव आहे.

ते ५५ वर्षांचे होते. भाऊ सतीशकुमार याच्या पहिल्या वर्षश्राद्धासाठी ते गावी आले होते. त्यांच्या भावाला गेल्या वर्षी ३१ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी मारले होते. बलबीर यांची नियुक्ती अमृतसरमध्ये होती. ते रजा घेऊन गावी आले होते.

त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. करकन हे हिंदू राजपूत होते. गावात त्यांचे एकमेव हिंदू कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या मुस्लीम मित्रांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. मुस्लिमांनीच त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

याशिवाय मुस्लीमांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची सुद्धा व्यवस्था केली. सीआयएसएफच्या एका पथकाने बलबीर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : दहिवली दरड दुर्घटनेतील बाप-लेकाचे मृतदेह अखेर सापडले

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT