Uttar Pradesh News: कानपूरमध्ये शुक्रवारी महानगर पालिकेने 'मामा-भांजे' नावाच्या हॉटेवर बुलडोजर चालवला. २६ सप्टेंबर रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली. मुस्लिम युवक मुबीन अहमद याने आपली ओळख लपवून हिंदू नावाने रेस्टॉरंट सुरु केल्याचा आरोप आहे.
हा मुस्लिम तरुण व्हेजच्या नावाखाली नॉनव्हेज शिजवायचा. या प्रकरणानंतर सदरील रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आलेलं होतं. ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या हॉटेलवर आता बुलडोजर चालवण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या किदवई नगर आणि बारादेवी क्रॉसिंगच्या मध्ये 'मामा-भांजे' नावाचं एक रेस्टॉरंट होतं. या हॉटेलमध्ये गंभीर प्रकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी २६ सप्टेंबर रोजी या ठिकाणी गोंधळ घातला.
बजरंग दलाचे सह जिल्हा संयोजक विशाल बजरंगी यांनी आरोप केला की, रेस्टॉरंटचा मालक मुबीन अहमद हा मुस्लिम आहे. परंतु त्याने आपली ओळख लपवण्यासाठी कपाळावर टिळा लावला आणि हिंदू असल्याचा बनाव केला. याशिवाय या तरुणाने शाकाहारी जेवणाच्या नावाखाली नॉन व्हेज जेवण लोकांना खाऊ घातलं, असा आरोप आहे.
या हॉटेलचा एक माजी कर्मचारी छोटू वर्मा याने याबाबत खुलासा केला होता. त्याच्या माहितीनुसार, मुबीन अहमद हा कपाळावर टिळा लावून ओळख लपवत होता. त्याने लोकांसोबत धोका केला आहे. बजरंग दलाने आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ रेस्टॉरंट बंद केलं. स्थानिकांनी या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर शनिवारी या रेस्टॉरंटवर बुलडोजर चालवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.