crime_ 
देश

युवतीची छेड काढल्याने उसळली दंगल; दोन गटात तुफान दगडफेक

सकाळन्यूजनेटवर्क

मुझफ्फरनगर- जिल्ह्यातील चालसिना गावात एका युवतीची छेड काढल्याने दंगळ उसळली आणि दोन गटात झालेल्या दगडफेकीत सहा जण जखमी झाले. छेडछाडीची घटना रविवारी सायंकाळी घडली. पीडित मुलगी घरात झोपलेली असताना एका व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश केला. तो तिच्याशी गैरवर्तन करु लागला. त्यावेळी तिचे पालक अन्य खोलीत होते. मुलीच्या खोलीत आरडाओरड ऐकून ते तिच्या खोलीत धावले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संतापला आणि त्याने हाणामारी सुरु केली. या घटनेची वार्ता कळताच गावकरी घरासमोर जमले आणि दोन गटात दगडफेक सुरू झाली. यात किमान सहा जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

१० शेतकरी संघटनांचं कृषी कायद्यांना समर्थन; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

18 वर्षाची मुलगी घरी झोपली होती. त्यावेळी एका व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि त्याने तिची छेड काढली. त्यावेळी तिचे आईवडील दुसऱ्या खोलीमध्ये होते. आरडाओरड ऐकूण ते तिच्या खोलीत आले. त्यावेळी व्यक्तीने त्यांचा विरोध केला आणि मुलीच्या आई-वडिलांचा मारहाण सुरु केली. दंगा ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी आले. व्यक्तीच्या बाजूनेही काही लोक तेथे आले. बघताबघता दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटात दगडफेकी झाली. ज्यात 6 जण जखमी झाले आहेत. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस अधिकारी विरजा शंकर त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जणांविरोधात आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, चालसिना गावात पोलिस फोर्स तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT