देश

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमृतसर रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. ही अत्यंत ह्रदयद्रावक अशी घटना आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

अमृतसरच्या चौडा बाजार परिसर भागात रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे यातील काही लोक रेल्वे रुळावरून हा कार्यक्रम पाहत होते. मात्र, त्यादरम्यान रेल्वे आल्याने रेल्वेरुळावर उभे असलेल्या लोकांना धडक दिली. यामध्ये 50 पेक्षा अनेकांचा मृत्यू झाला आहे. 

या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला. ते म्हणाले, अमृतसर रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. ही अत्यंत ह्रदयद्रावक अशी घटना आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. तसेच या अपघातात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT