My hug worked: Navjot Sidhu on Pakistan opening Kartarpur corridor
My hug worked: Navjot Sidhu on Pakistan opening Kartarpur corridor 
देश

पाक लष्करप्रमुखांची गळाभेट ही राफेल करार नाहीः सिद्धु

वृत्तसंस्था

भोपाळः  ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. 15-16 कोटी नागरिकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानने गुरू नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याची घोषणा केली. भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी कर्तारपूर मार्ग बांधावा, अशी विनंती भारताने पाकिस्तानला केल्यानंतर काही वेळातच पाकने ही माहिती दिली. यानंतर सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळा ऑगस्टमध्ये पार पडला होता. यावेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. गळाभेटीनंतर भारतीय जनता पक्षाने सिद्धू यांच्यावर टीका केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीसुद्धा सिद्धू यांच्या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती.

पाकिस्तानने कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याची घोषणा केल्यानंतर सिद्धू यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, 'पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट अखेर कामी आली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 2014 मधील मोदी लाट सर्वसामान्यांसाठी ‘जहर’ (विष) झाली. मोदी हे फक्त उद्योजकांच्या हातातील बोलके बाहुले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 2019 मध्ये मोदी लाट संपुष्टात येईल आणि राहुल गांधीच पंतप्रधान होतील, असा दावाही सिद्धु यांनी केला.

कर्तारपूर साहिब हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल येथे आहे. कर्तारपूर साहिब आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. रावी नदीच्या तीरावरील या गुरुद्वारात जाण्यासाठी भारतातील शीख भाविक इच्छुक असतात. ऑगस्टमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्यानंतर सिद्धू यांनी कर्तारपूर साहिबसंदर्भात पाकच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्याचा दावा केला होता. ‘दोन्ही पंजाबदरम्यानची कर्तारपूर येथील सीमा पाकिस्तानकडून खुली करण्याचे आश्वासन जनरल बाजवा यांनी दिले. गुरू नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानात कर्तारपूर येथील दरबारा साहिब गुरुद्वारात शीख भाविकांना त्यामुळे जाता येऊ शकेल, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानने गुरुवारी (ता. 22) कर्तारपूर मार्ग खुला केल्याचे जाहीर केल्याने सिद्धू यांच्या दाव्याला महत्त्वप्राप्त झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT