Mysterious Books
Mysterious Books esakal
देश

Mysterious Books : ही आहेत जगातील सर्वात रहस्यमय पुस्तके, तुम्ही कधी वाचलीत का?

सकाळ ऑनलाईन टीम

Mysterious Books : डिजीटलायझेशनमुळे कालांतराने लोकांची पुस्तके वाचण्याची गोडी कमी झाल्याचे दिसून येतेय. मात्र पुस्तके वाचल्याने केवळ ज्ञानच वाढत नाही तर तुमची एकाग्रतासुद्धा वाढते. रहस्यमय पुस्तके वाचून तुम्ही तुमची पुस्तकाची आवडही जपू शकता आणि काहीतरी वेगळं जाणून घेऊ शकता. जगातील काही रहस्यमय पुस्तके आजही अस्तित्वात आहे. आज आपण याच रहस्यमय पुस्तकांची यादी जाणून घेणार आहोत.

पुस्तकांनी आपल्याला केवळ आपल्या इतिहासाची जाणीव करुन दिली नाही तर आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित देखील केले आहे. आज मात्र आपण मिस्टेरियस म्हणजेच रहस्यमय पुस्तकांबाबत जाणून घेणार आहोत.

त्यातील एक पुस्तक डेविल्स बायबल हे आहे. हे पुस्तक राक्षसाने लिहीले आहे अशी मान्यता आहे. या बायबलच्या आत विचित्र चिन्हे आणि प्रतिमा आहेत. सध्या हे पुस्तक स्वीडनमधील स्टॉकहोम लायब्ररीमध्ये ठेवले आहे. या पुस्तकाच्या आत 310 पेजेस आहेत. त्याची पृष्ठे 160 गाढवाच्या त्वचेने बनलेली आहे.

या बायबलच्या लेखकाची अजूनही कोणाला माहिती नाही. तर तज्ज्ञांच्या मते, हे पुस्तक एका भिक्षूने तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहीले आहे. हे पुस्तक राक्षसाने लिहीले आहे यावर तज्त्रांनी साफ नकार दिलाय. मात्र तंत्रज्ञानानुसार एवढे मोठे पुस्तक लिहायला 30 वर्षे लागतील.

वोय्निच मॅन्यूस्क्रीप्ट

हे इटलीतील एक पुस्तक आहे. ज्याबाबत कोणीही ऐकलेले किंवा वाचलेले नाही असे म्हटले जाते. यात लिहीलेली भाषा सगळ्यात रहस्यमय आहे असे म्हटले जाते. हे पुस्तक पंधराव्या दशकात लिहीले गेले असावे असा अंदाज आहे. (History)

या पुस्तकाचे हे नाव पुस्तक विक्रेत्याने ठेवले आहे. विलफ्रेंड वोनिक असे या व्यापारयाचे नाव होते. हे हस्तलिखित त्याने 1921 मध्ये विकत घेतले. या हस्तलिखिताची काही पाने गहाळ आहेत आणि आता केवळ 240 पृष्ठे शिल्लक आहेत. शास्त्रज्ञ त्यास voynich manuscript म्हणतात.

या पुस्तकाच्या प्रत्येक पानात एक वेगळंच चित्र आहे आणि त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. त्यामध्ये अशी काही झाडे आणि वनस्पती आहेत जी पृथ्वीवर सापडलेल्या कोणत्याही झाडाच्या झाडाशी जुळत नाहीत. या हस्तलिखितामध्ये काय लिहिले आहे हे अद्याप कोणत्याही शास्त्रज्ञाला समजलेले नाही. इतिहासकारांच्या मते हे रहस्यमय पुस्तक 600 वर्षांपूर्वीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

Jobs: 2024मध्ये जवळपास 50 टक्के कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Hardik Pandya : हंगामातील खराब कामगिरीनंतर हार्दिकबाबत MI मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय? कामकाजावर सिनियर खेळाडूंचीही नाराजी

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT