Nagaland Assembly Elections 2023 Ramdas Athawale Republican Party of India wins two seats in nagaland  sakal
देश

Nagaland Assembly Elections Result : रामदास आठवलेंचा नागालँडमध्ये डंका! आरपीआय दोन जागांवर विजयी

सकाळ डिजिटल टीम

Nagaland Assembly Elections 2023 Result : महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यामधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे.

आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे.

सुरु असलेल्या मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी सध्या आघाडीवर असून यादरम्यान महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता बोलली दात आहे.

कोण आघाडीवर?

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षचे उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Village Jatra: दिवे गावच्या कातोबानाथ यात्रेला उत्साहाची झळाळी; कुस्ती आखाड्यात 220 मल्लांची दमदार हजेरी

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीया का साजरी केली जाते? या पौराणिक कथांशी आहे संबंध...

SCROLL FOR NEXT