Nagaland levies COVID-19 cess of Rs 5 per litre for diesel and Rs 6 for petrol 
देश

कोरोनाचा फटका; पेट्रोलवर ६ तर डिझेलवर ५ रुपये कोविड-१९ सेस

वृत्तसंस्था

गुवाहाटी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याचा फटका उद्योगधंद्याना बसत आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प आहे. अशात अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू महाग झाल्यानं सर्वसामान्यांना समस्या निर्माण होत आहे. नागालँड सरकारनं आपल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर सेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनावर कोविड-19 सेस आणि टॅक्स असं दोन्ही वाढवणारं देशातील हे पहिलंच राज्य आहे. पेट्रोलवर प्रतिलिटर ६ तर डिझेलवर ५ रुपये सेस आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी रात्री नागालँड सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (ता. २९) मध्यरात्रीपासून राज्यात सेसची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागालँड टॅक्सेशन अॅक्ट १९६७ कायद्यांतर्गत हा नवीन कर आकारला जाणार असल्याची घोषणा राज्यपाल यांनी केली आहे. इंधनावर असणारा कर त्यासोबत सेस आणि अतिरिक्त कोविड-१९चा उपकरही आकारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त आयुक्तांनी दिली आहे. वाढलेल्या या दरामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आता गगनाला भिडणार आहेत.

Coronavirus : 'या' तारखेपासून भारतात होणार रोज एक लाख टेस्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. प्रशासनाकडून घरी राहण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. तरीही लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन अनेक ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आधीच उद्योगधंदे ठप्प आणि आर्थिक अडचणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागालँड सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT