Chardham Yatra Google file photo
देश

न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठविली, कोरोना नियमांचं पालन अनिवार्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नैनीताल उच्च न्यायालयाने (nainital high court) चारधाम यात्रेवरील (chardham yatra) बंद उठविली आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच कोरोना निगेटिव्ह चाचणी देखील भाविकांसाठी अनिवार्य करण्यात आली असून कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नैनीताल उच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथसह चारधाम यात्रेवर आधी लावलेल्या बंदीच्या आदेशाला 18 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. यासंदर्भात १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश जारी करेपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, आता ही बंदी उठविण्यात आली आहे. तरीही न्यायालयाने कोरोना नियमांचे पालन करणे गरेजेचे आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये २२ जूनपर्यंत कोविडमुळे लागू केलेल्या संचारबंदीत वाढ केलेली असताना तीन जिल्ह्यातील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली होती. अर्थात चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट यावेळीही अनिवार्य करण्यात आला होता. चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येणार आहे. परंतु आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आली होती. आता न्यायालयाने चारधाम यात्रेवरील निर्बंध उठविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका गणपतीपुळे देवस्थानाला; लाडू प्रसाद बंद

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT