Punjab Haryana High Court on Suicide  sakal
देश

सुसाईड नोटमध्ये नाव असल्यानं आरोपी दोषी ठरत नाही : High Court

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : फक्त सुसाईड नोटमध्ये नाव असल्याने संबंधित व्यक्ती दोषी ठरत नाही, असं महत्वपूर्ण निरीक्षण पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं (Pujab Haryana High Court) नोंदवलं आहे. पंजाबच्या एका रहिवाशाविरोधातील आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील गुन्हा रद्द करताना न्यायालयानं हे मत मांडलं.

आयपीसीच्या कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका हरभजन संधूने उच्च न्यायालयात दाखल केली होती. तक्रारीनुसार, हरभजनचा मेहुणा बलजिंदर कुमार आणि इतर ६-७ जणांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी मनजीत लाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर मनजीत लाल यांनी आत्महत्या केली. मंजीत लालचे वडील जसविंदर लाल यांनी आरोप केला होता की, काही लोकांना मारहाण केल्यामुळे मनजीतने आत्महत्या केली. एफआयआर आणि सुसाईड नोटमधील माहिती पूर्ण बरोबर मानली तरी याचिकाकर्त्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील कृष्णसिंग डडवाल यांनी असा युक्तिवाद केला. त्यानंतर दुसऱ्या पक्षाने याचा विरोध केला.

याप्रकरणी न्यायामूर्ती बेदी म्हणाले, ''गुन्ह्यातील माहिती पुढे येईपर्यंत फक्त सुसाईट नोटमध्ये नाव असल्याने आरोपी दोषी सिद्ध होत नाही. सुसाईड नोट पूर्णपणे बरोबर मानली तरी त्यातील आरोप गुन्हा ठरत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यावर कारवाई जाऊ शकत नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT