Priyanka Gandhi, Narendra Modi esakal
देश

Punjab : काँग्रेस, आप 'एक ही थाली के चट्टे बट्टे'; मोंदीचे टीकास्त्र

कॉंग्रेस,आप पंजाबमध्ये नुरा कुस्ती खेळत आहेत

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पंजाबमध्ये फक्त कॉंग्रेसचे (Congress) आणि पंजाबी (Punjab)लोकांचेच मॉडेल चालेल. ना मोदींचे, ना केजरीवालांचे असे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी काल पंजाबमध्ये प्रचारा दरम्यान टोला लगावला होता. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कॉंग्रेसला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी 'आप'वर ही निशाणा साधला. कॉंग्रेस,आप 'एक ही थाली के चट्टे बट्टे' असे टोला मोदींनी लगावला आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये प्रचारा दरम्यान ते बोलत होते. पंजाबची निवडणूक जस-जशी जवळ येईल तशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या टोकाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. भाजपने ही सडेतोड उत्तर देत कॉंग्रेस सोबत आप वरही टीकास्त्र सोडले आहे. (Punjab Assembly Election 2022)

पंजाबची निवडणूक जस-जशी जवळ येईल तशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या टोकाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

मोदी म्हणाले, पंजाबमध्ये काँग्रेस मूळ असेल तर आप (AAP)तिची झेरॉक्स काॅपी आहे. एकाने पंजाब लुटला तर दुसरा दिल्लीतील घोटाळ्यात गुंतलेला आहे असा आरोप मोदींनी केला आहे. हे दोघे मिळून पंजाबमध्ये नुरा कुस्ती खेळत आहेत. एकमेकांच्या विरोधात असल्याचा आव ही आणत आहेत . हे दोन पक्ष 'एक ही थाली के चट्टे बट्टे' आहेत अशी टीका त्यांनी केली.

जिथे जिथे भाजपने स्वतःची सत्ता आणली तेथून दिल्लीतून रिमोट कंट्रोल करणाऱ्या कुटुंबाला (काँग्रेस) नेस्तनाबूत केले. पंजाबियत आमच्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. मात्र विरोधी पक्ष पंजाबकडे 'सियासत' (राजकारण) च्या दृष्टीकोनातून पाहतात. कॅप्टन साहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांना चुकीच्या दिशेने जाण्यापासून रोखायचे. आता तेही नाहीत. त्यामुळे काँग्रेसला लगाम लावणार कोण असा प्रतिकात्मक टोला मोंदीनी यावेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT