Narendra Modi
Narendra Modi  
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची दिवाळी कश्मीरमधील सैन्यासोबत साजरी 

वृत्तसंस्था

गुरेझ  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची दिवाळी कश्मीरमधील सैन्यासोबत साजरी केली. 

मी ज्यावेळेस जवांनासोबत आणि सशस्त्र सेनेसोबत वेळ घालवतो त्यावेळेस मला एक वेगऴ्याच प्रकारची ताकद मिऴत असते, असे यावेळी पंतप्रधांनानी सांगितले. जवांनांच्या कठोर परिश्रमांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. 

"सैनिकांनी आपल्या प्रियजनांपासुन दुर आपल्या मातृभूमीचे संरक्षण करणे, देशासाठी बलिदान देणे हे शौर्य आणि समर्पण याचे प्रतिक आहेत. सीमेवरती सैनिक उपस्थित असणे हे करोडो भारतियांसाठी दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने एक आशेचा किरण आहे आणि ही गोष्ट त्यांच्यामध्ये खुप मोठी उर्जा निर्माण करते,'' असा संदेश पंतप्रधानांनी जाताना दिला. 

सेना प्रमुख जनरल बिपिन रावत आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी पंतप्रधानांसोबत होते. 

पंतप्रधांनानी सैनिकांना दिलेली ही दुसरी दिवाळी भेट आहे, यापुर्वी त्यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आल्यानंतर महिनाभराने त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांना सियाचीन भागातील सैन्यासोबत वेळ घालवला होता. जगातील सर्वात उंच असणारे रणांगण जे त्यावेळी महिनाभरीपुर्वी आलेल्या पुरामुळे उद्धवस्त झाले होते, त्यासाठी त्यांना 570 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. 

"तुमच्यामुळे 125 कोटी भारतीय लोक दिवाळी ही आनंदाने साजरी करु शकतात. पुर्ण देश तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावुन उभा असेल,' असे यावेळी पंतप्रधानांनी सैनिकांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT