देश

Bihar election : मोदींशी नात्याच्या प्रदर्शनाची गरज नाही

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - भाजपने लोकजनशक्तीचे नेते चिराग पासवान यांच्यावर टीका केली असली तरी पासवान यांनी मात्र मवाळ भूमिका घेत भाजपने केवळ आघाडी धर्माचे पालन केले असल्याचा दावा केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांचे प्रदर्शन करण्याची गरज मला नाही, असेही त्यांनी रविवारी स्पष्ट केले. 

भाजप चिराग यांच्यावर नुकतीच टीका केली. त्यावर कोणतीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त न करता चिराग यांनी भाजपची नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयू) शी युती असल्याने त्यांनी अशी टीका करून आघाडी धर्माचे पालन केले असल्याचे सांगितले. नितीश यांच्यावर टीका करण्याची संधी मात्र त्यांनी सोडली नाही. नितीश हे ‘वाटा आणि राज्य करा’ या नीतीचे पालन करणारे नेते आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नितीश यांनी प्रचारात सर्व जोर पंतप्रधान आणि माझ्यातील अंतर दाखविण्यावर दिला आहे. मोदी यांच्याशी माझे कसे संबंध आहेत, हे मला जाहीरपणे करण्याची गरज नाही.जेव्हा वडील जेव्हा रुग्णालयात होते तेव्हापासून अंतिम प्रवासापर्यंत मोदींनी जे काही केले ते मी कधीही विसरू शकणार नाही. 

‘मोदींच्या विकास मंत्रासाठी कटिबद्ध’ 
माझ्यामुळे पंतप्रधान नरेंद्न मोदी हे कोणत्याही अडचणीत सापडू नयेत अशी माझी इच्छा आहे. त्यांनी त्यांचा आघाडी धर्म पाळावा. नितीश कुमार यांच्या समाधानासाठी ते माझ्याविरोधात काहीही बालू शकतात. मोदी यांच्या विकास मंत्रासाठी मी कटिबद्ध आहे, असेही चिराग पासवान यांनी आवर्जून सांगितले. 

केवळ जनतेच्या कल्याणासाठी : लव
नवी दिल्ली :
वडिलांच्या पराभवाचा बदला घ्यायला नव्हे, तर जनतेच्या कल्याणासाठी मी निवडणूक लढवत आहे, असा दावा काँग्रेसचे बांकीपूर मतदारसंघातील उमेदवार लव सिन्हा यांनी आज केला. लव सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा गेल्या लोकसभा निवडणूकीत रविशंकर प्रसाद यांनी पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. बांकीपूर हा विधानसभा मतदारसंघ याच क्षेत्रात येतो. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच लव सिन्हा यांनी भाजपचे तीन वेळेसचे आमदार नितीन नवीन यांना आव्हान दिले आहे. आपण गेल्या नऊ वर्षांपासून या मतदारसंघात काम करत असून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीच ही निवडणूक लढत आहे, असे लव सिन्हा म्हणाले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: १४ व्या वर्षीच वैभवनं युवराज, रैनाचा विक्रम तर मोडलाच, आता लक्ष्य या विश्वविक्रमावर

Crime News : नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल गहाळ करून ४ लाखांची लूट

Video : सावधान! तुम्ही कचरा तर खात नाही ना? हॉटेलमध्ये शिजत असलेल्या जेवणात कचरा टाकल्याचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Budh Gochar 2025: बुध ग्रहाची वक्री गती, मिथून राशीसह 'या' 5 राशींना येतील पैशाबाबत अडचणी

SCROLL FOR NEXT