Narendra Modi Esakal
देश

Narendra Modi : मोदींकडून प्रचारापोटी तब्बल झाला एवढा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघात प्रचारापोटी २४.०३ लाख रुपये खर्च केल्याचे उघड झाले.

वृत्तसंस्था

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघात प्रचारापोटी २४.०३ लाख रुपये खर्च केल्याचे उघड झाले असून त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी १४.८२ लाख रुपये खर्च केले. राय यांनी २०१४ च्या तुलनेत कमी खर्च केला, मात्र यावेळी मतांची टक्केवारी वाढली आहे. तसेच गोसेवा व संरक्षण या मुद्यावर लढणारे युग तुलसी पक्षाचे उमेदवार कोली शेट्टी यांनी १ लाख ९८ हजार ८२ रुपये खर्च करत ५७५० मते मिळवली.

उत्तर प्रदेशच्या हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते अजय राय यांचा प्रचारातील खर्च उघड झाला आहे. निवडणूक आयोगाकडे पक्षाकडून सादर केलेल्या खर्चानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात २४ लाख ३ हजार ९२२ रुपये खर्च केले.

त्याचवेळी अजय राय यांनी प्रचारासाठी १४ लाख ८२ हजार ५०३ रुपये खर्च केले. पंतप्रधानांनी प्रचारावर अधिक खर्च केला असला तरी विजयाचे अंतर बरेच कमी झाले आहे. अजय राय यांनी खर्चात म्हणाले, ‘ज्या सायकलवरून अर्ज भरण्यासाठी आलो, ती भाड्याची होती. त्याचाही खर्च जोडला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT