narendra modi ANI
देश

Narendra Modi : मोदींनी दिलेला शब्द पाळला ! हायड्रोजनवर चालणारी बस सेवा लवकरच होणार सुरु

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे.(Hydrogen Bus in Laddak)

भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी NTPC या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला पाच हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे.

सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि 1.7 मेगावॅटचा सोलर प्लांट देखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील 7.5 एकर जमीन भाड्याने दिली आहे.

अशोक लेलँड या प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपये खर्चून बसेसचा पुरवठा करत आहे. या बसचे भाडे सध्या सुरू असलेल्या बससेवेप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे. पहिली बस गुरुवारी येथे पोहोचली, मात्र अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे स्वातंत्र्यदिनी सेवा सुरू करण्याची योजना पुढे ढकलावी लागली.

हा प्रकल्प पंतप्रधानांच्या २०२० च्या स्वातंत्र्यदिनी कार्बन-न्यूट्रल लडाखच्या घोषणेच्या दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्यात आला आहे. त्यावेळी हिमालयाच्या कुशीत वसलेले लडाख नव्या उंचीकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते.

लडाखची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आपण त्यांचे केवळ संरक्षणच नाही तर त्यांचे पालनपोषणही केले पाहिजे. ज्याप्रमाणे सिक्कीमने ईशान्येतील 'सेंद्रिय राज्य' म्हणून स्वतःसाठी एक स्थान कोरले आहे, त्याचप्रमाणे लडाख, लेह आणि कारगिल देखील 'कार्बन न्यूट्रल' घटक म्हणून स्वतःसाठी एक प्रतिमा तयार करू शकतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

हायड्रोजन फ्युएल सेल बसेस भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिकरित्या कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाची चाचणी 11,500 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुर्मिळ वातावरणात आणि हवेतील कमी ऑक्सिजनमध्ये होणार आहे. पण त्याची खरी परीक्षा हिवाळ्यात होईल. जेव्हा लेहचे तापमान 20 अंशांच्या खाली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT