देश

'56 इंच' छाती असणारे PM मोदी जीममध्ये व्यायाम करतात तेव्हा...

सकाळ डिजिटल टीम

मोदी मेरठमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले होते. यावेळी मोदींनी जीमची पाहणी केली आणि चक्क व्यायामसुद्धा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दौऱ्यावर आहेत. मेरठमध्ये (Meerut) पंतप्रधान नरेंद्र मोदी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची (Major Dhyanchand Sports University) पायाभरणी करण्यासाठी पोहोचले आहेत. याआधी मोदी मेरठमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले होते. यावेळी मोदींनी जीमची पाहणी केली आणि चक्क व्यायामसुद्धा केला.

पंतप्रधान मोदींचा जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ संबित पात्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना संबित पात्रा यांनी म्हटलं की, सशक्त, समृद्ध आणि स्वस्थ भारताचा पाया आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मेरठमधील सरधना शहरातील सलावा आणि कैली गावाजवळ क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात याची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी मेरठमध्ये क्रीडा विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ केल्यानंतर काही खेळाडुंशी संवादसुद्धा साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT