Narendra Modi  sakal
देश

Narendra Modi : ‘पंतप्रधान कार्यालय म्हणजे शक्तिकेंद्र नव्हे’

पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हे यापूर्वी सत्तेचे केंद्र राहिले आहे. परंतु गेल्या दहा वर्षात ते जनतेची सेवा करण्याचे एक साधन म्हणून या कार्यालयाकडे पाहिले आहे. या कार्यालयातून १४० कोटी जनतेच्या सेवा केली जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हे यापूर्वी सत्तेचे केंद्र राहिले आहे. परंतु गेल्या दहा वर्षात ते जनतेची सेवा करण्याचे एक साधन म्हणून या कार्यालयाकडे पाहिले आहे. या कार्यालयातून १४० कोटी जनतेच्या सेवा केली जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर कार्यालयात गेले तेव्हा पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. यानंतर ‘पीएमओ’तील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी यापूर्वी पीएमओ हे शक्तिकेंद्र म्हणून ओळखले जात होते. गेल्या दहा वर्षात मात्र ही ओळख मिटविण्यात यश आले आहे. या कार्यालयातून होणाऱ्या निर्णयामुळे जनतेच्या विकासाला काही हातभार लागेल, हाच विचार माझ्या मनात असतो. लोकहिताच्या संबंधित निर्णय होत असलेल्या फाईलवर स्वाक्षरी करताना आपण १४० कोटी जनतेच्या हितासाठी काहीतरी करीत आहे, ही भावना मनात नेहमीच असते, असेही मोदी यांनी सांगितले.

जनतेचे शिक्कामोर्तब

पीएमओ हे जनतेच्या सेवेचे केंद्र व्हावे, असे सांगत ते म्हणाले, या निवडणुकीच्या निकालाने ‘पीएमओ’ने घेतलेल्या निर्णयावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT