(सौजन्य - Money Control)  
देश

...तर आज भारत एक अब्ज डोस बनवू शकला नसता - पूनावाला

ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीच्या भारतीय उत्पादकांशी संवाद साधला. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) आदर पूनावाला देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी हजेरी लावली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ रेड्डीज लॅबोरेटरिज् , झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासिया बायोटेक या सात लस निर्मात्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

देशाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर ही बैठक पार पडल्यामुळे येणाऱ्या काळात देशात लशींचा पुरवठा आणि त्याचे नियमन कशा पद्धतीने होणार यावर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती प्रसिद्धी केली. मागील 24 तासांमध्ये 68 लाख 48 हजार 417 लशींचे डोस देण्यात आले. त्यामुळे भारतात कोरोना लस मिळालेल्या व्यक्तींचा आकडा 100 कोटींच्या वर जाऊन 101.30 कोटी झाला आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली.

...तर आज भारत एक अब्ज डोस बनवू शकला नसता!

पंतप्रधानांनी सर्व सूत्र खूप वेगाने हलवली. आरोग्य मंत्रालयापासून सर्वांना तत्काळ कामाला लावले. जर ते नसते तर आज भारत एक अब्ज डोस बनवू शकला नसता, असा निर्वाळा सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी दिला. पंतप्रधानांची बैठक झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT