Narendra Modi is loudspeaker of Adani and Ambani says Former Congress president Rahul Gandhi in Haryana 
देश

मोदी अंबानी-अदानींचे "लाउडस्पीकर' - राहुल गांधी

पीटीआय

नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले. 

हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या वेळी गांधी यांनी मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर जोरदार टीका केली. हे दोन्ही नेते गरिबांबाबत शब्दही काढत नाहीत, असा आरोप गांधी यांनी केला. गांधी म्हणाले की, मोदी हे अंबानी आणि अदानींचे लाउडस्पीकर असून, दिवसभर ते त्यांच्याबद्दलच बोलत असतात. मोदी आणि खट्टर हे गरिबांच्या खिशातील पैसा काढून तो आपल्या पंधरा श्रीमंत मित्रांना देत आहेत. मोदी, खट्टर हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची आपल्या पंधरा श्रीमंत मित्रांना विक्री करीत आहेत. ब्रिटिशांप्रमाणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील नागरिकांमध्ये जात, धर्म आणि प्रांतावरून फूट पाडत आहेत. 

कॉंग्रेसने सदैव देशातील नागरिकांना एकजूट करण्याचे राजकारण केले, असा दावाही गांधी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT