Narendra Modi Oath Ceremony  esakal
देश

Narendra Modi Oath Ceremony : PM नरेंद्र मोदी शपथ घेत असलेल्या संसद भवनासाठी ३३० एकर जमीन कुणी दिली?

राष्ट्रपती भवन चार मजली असून त्यात एकूण ३४० लहान-मोठ्या खोल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi Oath Ceremony :

भाजप नेते नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी आज सायंकाळी ७ वाजता दिल्लीतील संसदभवनात पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याची सर्व तयारी अतिम टप्प्यात आली आहे.

याच निमित्ताने PM मोदी शपथ घेणार असलेल्या संसद भवनाचा तिहास रंजक आहे. संसद भवन कुठे उभारण्यात आले? त्यासाठी कोणी जागा दिली याबद्दलचा इतिहास आज आपण जाणून घेऊयात.  

३३० एकरात हे संसद भवन बनवण्यात आले आहे. संसद भवन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानले जाते. संसद भवन दिल्लीच्या जनपथवरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.  ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीत हलवण्याची घोषणा १९११ च्या दिल्ली दरबारात झाली.

तेव्हा व्हाईसरॉयसाठी नवीन घर बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. ब्रिटीश इंजिनिअर एडविन लुटियन्स यांच्यावर नवीन घराचा साचा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते दिल्लीच्या शहर नियोजन समितीचे सदस्यही होते.

१९१२-१३ साली ब्रिटीश इंजिनिअर एडविन लुट्येन्स आणि हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्चीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे.

एडविन लुटियन्स आणि त्यांच्या टीमने प्रथम संपूर्ण दिल्लीची पाहणी केली. दिल्लीच्या उत्तरेकडील भागात व्हाईसरॉय हाऊस बांधल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांना आढळून आले. कारण तो भाग यमुना नदी शेजारी होता. त्यामुळे त्यांनी दक्षिणेकडील रायसिना हिल्स परिसरात व्हाईसरॉयचे घर बांधण्याचा निर्णय घेतला.

हा परिसर मोकळा आणि हवेशीर होता. तसेच तो शहराच्या उंच भागावर होता. त्यामुळे भविष्यात ड्रेनेज, किंवा पाणी साचण्याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असा विचारही या संसदेच्या बांधकामावेळी करण्यात आला. त्याचा आता फायदा झाल्याचे दिसून येते.

जयपूरच्या महाराजांनी दिली जमीन

rashtrapatibhavan.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, रायसीना हिल्सची जमीन जी व्हाईसरॉयच्या घरासाठी निवडण्यात आली होती. ती तेव्हा जयपूरच्या महाराजांची होती. संस्थान काळ असल्याने तेव्हा जमिनी महाराजांच्या नावावर असायच्या. तेव्हा महाराजांनी ही जमीन व्हॉईसरॉय यांच्या घरासाठी दिली.

व्हाईसरॉय हाऊस पूर्ण झाल्यावर समोरच्या भागात एक खांब खास बसवण्यात आला. ज्याला ‘जयपूर स्तंभ’ म्हणतात. ते जयपूरचे महाराजा सवाई माधो सिंग यांनी भेट म्हणून दिले होते.

राष्ट्रपती भवन चार मजली असून त्यात एकूण ३४० लहान-मोठ्या खोल्या आहेत. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे सुमारे २ लाख स्क्वेअर फूट पसरलेले आहे. इमारतीच्या उभारणीत ७० कोटींहून अधिक विटा वापरण्यात आल्या आहेत.

तर तीन दशलक्ष घनफूट दगडाचा वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या बांधकामात एकूण २३,००० मजूर कामावर होते, त्यापैकी ३००० लोक दगड फोडणारे होते.

विशेष गोष्ट म्हणजे, संसद भवनाची इमारत एका मंदिरासारखी बांधण्यात आली आहे. भव्य असे वर्तुळाकार संसद भवन चौसष्ट योगीनी मंदिरासारखे साकारले आहे. मध्य प्रदेशातील मुरैना येथे हे प्राचिन मंदिर आहे. ज्यात चौसष्ट योगिनी देवींची छोटी मंदिरे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT