manmohan singh and narendra modi Sakal
देश

मोदी की, मनमोहन; कुणाच्या काळात किती केंद्रीय विद्यापीठं सुरू झाली?

यूपीए सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी 20 केंद्रीय विद्यापीठे सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात 159 केंद्रीय विद्यालये (KV) बांधण्यात आली. तर, पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सुरुवातीच्या आठ वर्षांत 202 केंद्रीय विद्यालयांच्या शाळा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारातून (RTI) ही माहिती समोर आली आहे. (Kendriya Vidyalaya News)

माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या एनडीए (NDA Government) सरकारमध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक 20, उत्तर प्रदेशात 17, राजस्थान 14, कर्नाटक 13, छत्तीसगढ आणि ओडिसामध्ये प्रत्येकी 10 केंद्रीय विद्यापीठं सुरू करण्यात आली आहेत. तर यूपीए सरकारच्या (UPA Government ) सुरुवातीच्या आठ वर्षांच्या काळात ओडिशामध्ये सर्वाधिक 24, मध्य प्रदेशमध्ये 20, बिहार 16, यूपीमध्ये 12, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 11 केंद्रीय विद्यापीठं सुरू करण्यात आली, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 10 केंद्रीय विद्यापीठं सुरू करण्यात आल्याची माहिती यातून समोर आली आहे.

तर, 01.04. 2022 पर्यंत, काठमांडू, मॉस्को आणि तेहरान येथे परदेशात कार्यरत असलेल्या तीन केंद्रीय विद्यालयांसह 1248 केंद्रीय विद्यालये असल्याचे केंद्रीय विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 2004-05 ते 2011-12 पर्यंत म्हणजेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरुवातीच्या 8 वर्षांच्या कार्यकाळात 202 केंद्रीय विद्यापीठांची सुरुवात झाली. तर, यूपीए सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी 20 केंद्रीय विद्यापीठे सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT