Narendra Modi sakal
देश

शेतीला निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडा : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवाहन; रासायनिक खतांना पर्याय शोधावा लागेल

सकाळ वृत्तसेवा

आणंद (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती (Organic And Natural Farming) करण्याचे आवाहन करतानाच शेतीला (Farming) आता रसायनांच्या प्रयोगशाळेतून बाहेर काढून निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडण्याची वेळ आली असल्याचे नमूद केले. येथे नैसर्गिक शेतीबाबत आयोजित राष्ट्रीय संमेलनामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये ते व्हर्च्युअली सहभागी झाले होते. शेतामध्येच जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्याच्या समस्येवर त्यांनी चिंता व्यक्त करतानाच यामुळे शेतीच्या एकूणच उत्पादकतेवर परिणाम होतो अशी चिंता व्यक्त केली. शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही चुकीच्या पद्धती रूढ झाल्या असून त्यात सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की, ‘‘ हरित क्रांतीमध्ये रसायने आणि खतांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली असली तरीसुद्धा त्याच्यावर पर्याय शोधण्यासाठी देखील आपल्याला युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे. ही समस्या तीव्र होण्यापूर्वीच आपण आता एक मोठे पाऊल टाकायला हवे. उपचारापेक्षा प्रतिबंध हा कधीही चांगलाच असतो. रासायनिक घटकांच्या वापरामुळे शेती अधिक खर्चिक होऊ लागली असून शेती उत्पादनांच्या किमती देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.’’

मोदी म्हणाले

शेतात काडीकचरा जाळल्याने उत्पादकता घटून प्रदूषण वाढते

उत्तर भारतात शेतात काडीकचरा जाळल्यानेच प्रदूषण वाढले

नैसर्गिक शेती ही देखील विज्ञानाधारित, गायीचे महत्त्व मोठे

गायीचे शेण आणि गोमूत्र हे उत्तम कीटकनाशक आहे

लहान शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती अधिक फायदेशीर आहे

संशोधन संस्थांनी त्यांचे काम शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे गरजेचे

जग तुमची वाट पाहते आहे

सर्व राज्यांना आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला लोकचळवळीचे रूप देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. प्रत्येक पंचायतीमधील किमान एका तरी खेड्याने पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे, गुंतवणूकदारांनी देखील यामध्ये आपला पैसा गुंतवावा. तुमच्या उत्पादनाची अवघे जग वाट पाहात असल्याचे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर परिसरातील इंटरनेट बंदीविरोधी याचिकेवर आजच दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT