Shivraj Singh Chouhan recalls his first meeting with Prime Minister Narendra Modi and shares a memorable political moment.

 

esakal

देश

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Narendra Modi and Shivraj Singh Chouhan first meeting memory: ‘’...त्या दिवशी रात्रभर मोदी झोपलेच नव्हते अन् रडत होते’’ अशी आठवणही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितली आहे.

Mayur Ratnaparkhe

When Did Shivraj Singh Chouhan First Meet Narendra Modi?: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५वा जन्मदिवस आहे. यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना काल रात्रीच शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही मोदींना शुभेच्छा देत, त्यांच्या पहिल्या भेटीचा खास किस्सा सांगितला आहे. 

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, त्यांची आणि पंतप्रधान मोदींची पहिली भेट १९९२-९३मध्ये झाली होती, जेव्हा भाजपने कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत एकता यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. या यात्रेचे नेतृत्व डॉ. मुरली मनोहर जोशी करत होते आणि संपूर्ण यात्रेची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवली गेली होती.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, त्यावेळी काश्मीर घाटीत दहशतवाद प्रचंड फोफावलेला होता. लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवणे अशक्य वाटत होते. परंतु जेव्हा २६ जानेवारी रोजी एकता यात्रा श्रीनगरला पोहचली, तेव्हा लाखो लोकांच्या अपेक्षा आणि मोदींच्या व्यवस्थापनाने मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला. तसेच शिवराज सिंह यांनी हेही सांगितलं की, मी पण त्या यात्रेचा भाग होतो आणि पहिल्यांदाच मी मोदींना खूप जवळून बघितलं. त्यांच्यात एक जिद्द, उत्कटता आणि जोश होता की लाल चौकावर तिंरगा नक्कीच फडकवायचा आहे.

तसेच शिवराजसिंह यांनी त्या दिवसाचे स्मरण करत पुढे सांगितले की, सुरक्षेच्या कारणांमुळे जेव्हापासून सामान्य कार्यकर्त्यांना लाल चौकात जाण्यापासून रोखले गेले, तेव्हा हजारो कार्यकर्ते नाराज झाले आणि प्रचंड संतापले देखील होते. नंतर जेव्हा मोदी परत येऊन जम्मूला पोहचले आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला होता.

याचबरोबर शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, मी पहिल्यांदा पाहिले की कडक शिस्त आणि दृढनिश्चियी दिसणारे मोदी किती संवेदनशील व्यक्ती आहेत. ते संपूर्ण रात्रभर झोपले नाही, रात्रभर बसून रडत होते. दु:ख एकच होतं, वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की सहकारी कार्यकर्ते श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावण्यात आल्याच्या क्षणाचे साक्षीदार बनू शकले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT