नरेंद्र मोदी sakal
देश

स्वतःला बदला, नाहीतर तुम्हाला बदलावे लागेल : मोदी

मोदींचा दांडीबहाद्दर खासदारांना कडक इशारा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसद अधिवेशन चालू असताना गायब होणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘ही सवय बदला नाही तर मलाच तुम्हाला बदलावे लागेल, इतक्या कडक शब्दांत इशारा दिला. संसदेवर निवडून येणाऱ्या खासदारांनाही संसदेत बालिशपणा न करण्याचा सल्ला देण्याची वेळ पंतप्रधानांवर आल्याचे दिसले.

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत त्यांनी कानउघाडणी केली. तुमचे बेशिस्त वर्तन मला त्रासदायक ठरेल व मी तुमच्याशी लहान मुलांशी वागतात तशा शिस्तीने वागेन हे माझ्यासाठीही चांगले नाही. मुलांनाही एखादी गोष्ट अनेकदा सांगितली तर आवडत नाही, असे ते म्हणाले.

लोकसभाच नव्हे तर सरकारचे अल्पमत असलेल्या राज्यसभेत सत्तारूढ बाकांवरील उपस्थिती रोडावल्याचे चित्र महत्त्वाची विधेयके मंजूर होतानाही अलीकडे पुन्हा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी स्वपक्षीय खासदारांना संसदीय उपस्थितीबाबतचा कडक इशारा दिला.

या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना व नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबतही चर्चा केली. रूग्णसंख्या कमी होत आहे, तसा लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे, याबद्दल चिंता व्यक्त करून मोदी म्हणाले की, पर्यटन स्थळे व बाजारपेठांत पुन्हा गर्दी उसळत आहे हे चिंताजनक आहे. कोरोना आरोग्य नियम सक्तीने पाळण्याबद्दल भाजप खासदारांनी लोकांमध्ये जागृती करावी. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही व याचे नवनवीन म्यूटंट सतत समोर येत आहेत.

यापूर्वी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही मोदींनी नव्या मंत्र्यांना पत्रकारांशी विनाकारण न बोलण्याबाबत कडक समज दिली होती. सकाळी ९.३० च्या ठोक्याला मंत्रालयांत हजर राहिलेच पाहिजे. तुमचे काम चमकले पाहिजे, चेहरा नव्हे अशी तंबी मोदींनी नव्या मंत्र्यांना दिली होती. संसदेत अधिवेशन काळात हजर राहण्याबाबत मोदींनी २०१४ पासून अनेकदा भाजप खासदारांना समज दिली आहे. हा शब्दांचा मार मोदींना किती वेळा द्यावा लागणार, असा सवाल शिस्तप्रिय भाजप खासदारांत आज चर्चेचा विषय ठरला.

मोदी सरकारने बिरसा मुंडा यांची जयंती (१५ नोव्हेंबर) आदिवासी समाज दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नक्वी, व्ही. मुरलीधरन, कायदा मंत्री किरेन रिजीजू आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचा

खासदारांना सल्ला

शिस्तीत राहा

संसदेत वेळेवर येत जा

माध्यमांशी विनाकारण बोलू नका

बैठका, चर्चांमध्ये भाग घेत चला

नाव पुकारल्यावरच बोला

संसदीय उपस्थितीबाबतच्या स्पर्धेत भाग घ्या

नियमित सूर्यनमस्कार घाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT