PM Modi Mathura Visit eSakal
देश

PM Modi Mathura Visit : PM मोदी मथुरा दौऱ्यावर; श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेणारे ठरणार पहिलेच पंतप्रधान!

PM Modi in Mathura : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रज रज उत्सवात सहभागी होतील.

Sudesh

Shri Krishna Janmabhoomi temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (23 नोव्हेंबर) मथुरा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते ब्रज रज उत्सवात सहभागी होतील. यासोबतच पंतप्रधान मोदी हे श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे पदावर असताना या मंदिरात जाणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. आतापर्यंत देशाच्या एकाही पंतप्रधानाने आपल्या कार्यकाळात या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं नाही.

पंतप्रधान मोदींचा हा चौथा मथुरा दौरा असणार आहे. 2015 साली ते पहिल्यांदा मथुरेमध्ये आले होते. त्यानंतर 2019 साली त्यांनी दोन वेळा मथुरेला भेट दिली. या सर्व भेटींवेळी त्यांनी मंदिरांमध्ये जाणं टाळलं होतं. मात्र, आता या दौऱ्यात ते कृष्ण जन्मभूमी मंदिरात जाणार आहेत.

वाद पुन्हा पेटणार?

श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद इदगाह याचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हा वाद अगदी उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सगळ्यात पंतप्रधान मोदींनी या मंदिरास भेट दिल्यास पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासोबतच, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. काशीमधील दिव्य धाम आणि अयोध्यामधील राम मंदिरानंतर श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT