Vijayan 
देश

नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रमाणपत्रावरून काढले

पीटीआय

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज को-विन या ॲपला चाळणी लावतानाच कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंaद्र मोदी यांचे छायाचित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. 

या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवडणूक आयोगाला ९ मार्च रोजीच पत्र लिहिले असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आम्ही काही तांत्रिक उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि केंद्रशासित पुदुच्चेरीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर को-विन ॲपमध्ये काही आवश्‍यक फिल्टर्स लावण्यात आले असल्याचे  आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. केंद्र सरकार आणि भाजपने देखील हे नियम पाळावेत, असे तृणमूलने म्हटले होते. कोरोना लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचे छायाचित्र काढून टाकण्यात यावे असेही तृणमूलचे म्हणणे होते.

विजयन यांच्याविरोधात तक्रार
केरळमधील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथाला यांनी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विजयन यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चेन्नीथाला यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी ४ आणि ६ मार्च रोजी पक्षाच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन काही नव्या योजनांची घोषणा केली होती. राज्य सरकारच्या घोषणा आचार संहितेचा भंग ठरतात. केवळ मतदारांना भुरळ घालण्यासाठी या घोषणा करण्यात आल्या होत्या.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT