Agriculture Minister Esakal
देश

Agriculture Minister: नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर; अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री

मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. नरेंद्र सिंह तोमर यांच्या जागी कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा हे कृषी मंत्री आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील दिमानी मतदारसंघातून पक्षाने केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत तोमर यांनी बसपाचे उमेदवार बलवीर सिंह दंडौतिया यांचा पराभव केला होता. भाजपने दिमानी जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि ते संघर्षाने साध्य केले असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तोमर यापूर्वीही मुरैना येथून खासदार होते. (Latest Marathi News)

ते केंद्रातील कृषी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते, त्यामुळे आता त्यांना ही जबाबदारी सोडावी लागली आहे, असे सांगत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ते केंद्रातील कृषी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते, त्यामुळे आता त्यांना जबाबदारी सोडावी लागणार आहे, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांची होणार कपात

राजीनामा देणाऱ्यांमध्ये प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर हे केंद्रीय मंत्री आहेत. त्याचवेळी छत्तीसगडच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह याही राजीनामा देणार आहेत. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्री कमी होणार आहेत. याशिवाय राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथ यांनीही राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या खासदारांची संख्या 12 असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT