देश

वन कर्मचाऱ्यांकडून तिरंग्याचा अवमान

सकाळ वृत्तसेवा

खानापूर - वन कर्मचाऱ्यांनी दोन राष्ट्रध्वजांचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (ता. १६) खानापूर तालुक्‍यातील मेरड्यात घडला. ग्रामस्थांनीच याविरोधात आवाज उठविल्यानंतर नंदगड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, या भागातील एका वनाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून वन कर्मचाऱ्याने कार्यालयातील राष्ट्रध्वज बाहेर काढून त्याचा अवमान होईल, असा प्रकार केला. काही ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून त्याला जाब विचारला. त्या वेळी त्याने अधिकाऱ्याच्या सूचनेवरूनच हे कृत्य 
केल्याचे सांगितले. ‘ध्वज जुने आहेत, ते येथे नकोत’ असे अधिकाऱ्याने सांगितल्याने मी त्यांच्या आदेशाचे पालन केल्याचे कर्मचाऱ्याने ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्याला जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. राष्ट्रध्वज धुण्यास सांगितले होते, असे सांगून अधिकाऱ्याने हात वर केले. मात्र, धुण्यासाठी नेलेल्या ध्वजांचा अवमान केलाच कसा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. व याची माहिती नंदगड पोलिसांना देऊन कठोर कारवाईची मागणी केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक सुमा नाईक यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोघांना ताब्यात घेऊन नंदगड पोलिस स्थानकात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करीत निदर्शने केली. यासंदर्भात वनक्षेत्रपालांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

दोन राष्ट्रध्वजांचा अवमान होताना लोकांनी पाहिले. हा देशद्रोह असल्याच्या भावनेतून आम्ही संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम होतील.
- रणजित पाटील,
ग्रामस्थ, हलगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT