Farooq Abdullah  
देश

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

National Conference chief Farooq Abdullah: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या रोडशोदरम्यान एकाने चाकूहल्ला केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या रोडशोदरम्यान एकाने चाकूहल्ला केला आहे. यामध्ये तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मेंधार भागामध्ये फारुख अब्दुल्ला आणि अनंतनागचे पक्षाचे उमेदवार मियाँ अलताफ राजौरी हे सभेला संबोधित करत होते. त्यावेळी एका हल्लेखोराने चाकूहल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे तीन कार्यकर्ते यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उप-जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. या दोघांची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार जावेद राणा यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षेमधील ही मोठी चूक असल्याचं ते म्हणाले आहेत. 'अशा सुरक्षेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे. मी पोलिसांकडे मागणी करतो की त्यांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडावे आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी', असं ते म्हणाले. हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात २ हल्ले

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि शोपियामध्ये विविध ठिकाणी दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. शोपियांमधील दहशतवादी हल्ल्यात भाजपचे नेते एजाज अहमद यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. एजाज अहमद माजी सरपंच होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दुसऱ्या एका घटनेमध्ये पर्यटनासाठी आलेल्या दोघांवर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

Sangli Crime : सोनी-पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून; मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण

आजचे राशिभविष्य - 09 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT