National Constitution Day 2023 esakal
देश

National Constitution Day 2023 : भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व

संविधान दिवस साजरा करण्याची परंपरा खरं तर २०१५ पासून सुरू करण्यात आली

Monika Lonkar –Kumbhar

National Constitution Day 2023 : भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरूणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्वे रूजवणे. आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

आज आपण हा भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो? आणि त्याचे महत्व काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

संविधान दिन का साजरा केला जातो ?

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. त्यामुळे, हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

संविधान दिवस साजरा करण्याची परंपरा खरं तर २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, खरं तर तेव्हापासूनच हा दिवस आपल्या भारतात दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिनाचे महत्व काय ?

भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.

आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT