Rahul Gandhi and Sonia Gandhi during a Congress party event amid legal developments in the National Herald case.

 

Esakal

देश

National Herald Case Update : 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात राहुल गांधी अन् सोनिया गांधींना मोठा धक्का!

National Herald case and Rahul Gandhi, Sonia Gandhi : दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली, ‘ईडी’च्या याचिकेवर कारवाई

Mayur Ratnaparkhe

Major legal setback for Rahul Gandhi and Sonia Gandhi in the National Herald case: दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस बजावली आहे. ‘ED’ने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते, परंतु राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दखल घेण्यास नकार दिला होता. 

सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात ईडीचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अंतिम निष्कर्ष असा आहे की आरोपींना ५० लाख रुपयांच्या बदल्यात दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.

ईडीने राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे. ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सात आरोपींना नोटीस बजावल्या आहेत.

 एसजी तुषार मेहता यांनी सांगितले की, जून २०१४ मध्ये एका व्यक्तीने खासगी तक्रार दाखल केली होती, ज्याची कनिष्ठ न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तुषार मेहता यांनी सांगितले की ईडीने तपास पूर्ण केला, पुरावे गोळा केले आणि आरोपींचे जबाब नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT