Gitanjali
Gitanjali 
देश

'गीतांजली'कडून बनावट हिऱ्यांचीही विक्री 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) 11 हजार 400 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची सुई "गीतांजली जेम्स'कडेही वळलेली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीबरोबरच "गीतांजली'चा मालक मेहुल चोक्‍सी या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी आहे. हिरे विक्रीत चोक्‍सी कशी फसवणूक करीत होता, याचा गौप्यस्फोट "गीतांजली जेम्स'चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी सोमवारी केला. 

चोक्‍सीने केवळ "पीएनबी'चीच फसवणूक केली असे नाही, तर ग्राहक आणि त्यांच्या ब्रॅंडसाठी काम करणाऱ्या सेलिब्रिटीनांही त्याने गंडा घातला आहे. संगीतकार, गायक व अभिनेता हिमेश रेशमियालाही त्याने फसविले असल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे. हिमेशला एका दूरचित्रवाणीवरील जाहिरातीच्या बदल्यात चोक्‍सीने कमी किमतीतील हिरे दिले आहेत. इतकेच नाही तर मूळ किमतीपेक्षा दहा पटीने जास्त किमतीने तो हिरे विकत असे. एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना संतोष श्रीवास्तव यांनी चोक्‍सीचे फसवणुकीचे फंडे उघड केले आहेत. 

"गीतांजली'कडून अनेकदा ग्राहकांना बनावट व कमी किमतीतील हिरे भरमसाट किमतीने विकले गेल्याचे सांगून त्यांनी याचे उदाहरणही दिले. ग्राहकाला एक हिरा 50 लाखाला विकला असला तरी "गीतांजली'साठी त्याचे मूल्य केवळ दोन ते तीन हजार रुपये एवढेच असते. अशा प्रकारे चोक्‍सी अस्सल व बनावट हिऱ्यांची सरमिसळही करीत असे, असे त्यांनी सांगितले. ""हिऱ्याचे मूल्य ठरविण्याच्या प्रक्रियेत आपला प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, हा सर्व भाग माझ्या अखत्यारीत येत असे. ही गोष्ट मी पुष्कळ वेळा मेहुल चोक्‍सीच्या नजरेस आणून दिली. मात्र, हा तुझा कामाचा भाग नाही. तू तुझे काम कर, असे सांगून तो आपल्याला गप्प बसवत असे,'' असा खुलासा श्रीवास्तव यांनी या वेळी केला. 

ते म्हणाले,"मी गीतांजली ग्रुपमध्ये 2009 ते 2013 या कालावधीत काम केले. या काळात कंपनीत काळेबेरे होत असल्याचे दिसून आले. चोक्‍सी विदेशातून कच्चे हिरे खरेदी करत असे. ते भारतात आणून त्याला पैलू पाडून विदेशात नेऊन विकत असे. हे सर्व काम तो बनावट कंपनींमार्फत करीत असे. पैलू न पाडलेले हिरे खरेदी करण्यासाठी चोक्‍सी कर्ज घेत असे. विक्रीसाठीही तो कर्ज काढीत असे. टॅगमध्ये बदल करून, खोट्या पावत्या व कर्ज घेऊन हे सर्व काम करीत असे. या दरम्यान, हिऱ्याची किंमत तो दहा पटीने वाढवत असे.'' 

"प्रतिनिधी नेमून त्यांच्याद्वारे व्यवसाय करण्यावर कंपनी भर देत असे. यात दहा रुपये किंमतीच्या साहित्याची किंमत 500 रुपये दाखवून खोटी बिले तयार केली जात असत. अन्य कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी उचलला जात असे. या प्रकाराची मी अर्थ मंत्रालयापासून कंपनी रजिस्ट्रारपर्यंत तक्रार केली होती; पण कोणी याची दखल घेतली नाही. 2013 मध्ये मी पंतप्रधान कार्यालयाकडेही हे प्रकरण नेले. तेथून ते कंपनी रजिस्ट्रारकडे पाठविण्यात आले; पण तेथेही निराशाच पदरी पडली. काही काळाने हे प्रकरण बंद केला असल्याचा मेल आपला सहकारी हरिप्रसादला आला,'' असा दावाही श्रीवास्तव यांनी केला. 

विरोधात तक्रारी 
कंपनीकडून होत असलेल्या फसवणुकीचा मी साक्षीदार असल्याने मला अडकविण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगताना श्रीवास्तव म्हणाले की, 2013 पासून माझ्यावर दबाव आणण्यात आला. अनेक प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोक्‍सीने आर्थिक गुन्हे शाखेत माझ्याविरुद्ध तक्रार केली; पण 2014 मधील अहवालानुसार या सर्व तक्रारी खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. त्याच वेळी "गीतांजली'च्या हिशेबात गडबड असल्याचे आढळून आले होते. 

हिमेश रेशमीयाला ठगविले 
टीव्हीवरील जाहिरातीच्या बदल्यात 50 लाखांचे हिरे देण्याचे आश्‍वासन हिमेश रेशमीयाला दिले होते. मिळालेल्या हिऱ्याची तपासणी हिमेशने बाजारात केली असता त्यांची किंमत खूपच कमी असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे हिमेशची नाही तर अन्य सेलिब्रिटींनाही फसविण्यात आले असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. 

"पीएनबी'च्या गैरव्यवहारात मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सीच आहे. त्यानेच ही सुरवात केली. नंतर नीरव मोदी यात आला. 
- संतोष श्रीवास्तव, "गीतांजली जेम्स'चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 

श्रीवास्तव यांचे आरोप 
- प्रयोगशाळेत तयार केलेले कृत्रिम हिरे खऱ्या हिऱ्यांमध्ये मिसळले जात होते. असे हिरे ग्राहकांना खरे हिरे म्हणून विकले जात असत. 
- कृत्रिम हिऱ्यांची दहापट अधिक किमतीने विक्री 
- नकली हिरे विकून सेलिब्रिटींची फसवणूक 
- दर महिन्याला दहा हजार ग्राहकांना नकली हिऱ्यांची विक्री 
- कंपनीच्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही तांब्याची मोठी भेसळ 
- फसवणुकीसाठी फ्रॅंचाईसीवर दबाब 
- बनावट ऑडिट अहवाल तयार केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT