Jignesh Mevani
Jignesh Mevani 
देश

कोरेगाव भीमावर मोदींनी मौन सोडावे: मेवानी

वृत्तसंस्था

नवी दिली : दिल्ली पोलिसांनी नाकारलेली परवानगी झुगारून आमदार जिग्नेश मेवानी यांनी घेतलेल्या "युवा हुंकार रॅली'मुळे आज दिल्लीत संसद मार्गावर तणाव नाट्य रंगले. "भीम आर्मी'चा नेता चंद्रशेखर याच्या सुटकेच्या मागणीसाठी झालेल्या या रॅलीमध्ये शक्तिप्रदर्शनाचा मेवानी यांचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही; मात्र कोरेगाव भीमावर पंतप्रधानांनी मौन सोडावे, अशी मागणी करून मेवानी यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. 

"युवा हुंकार रॅली'च्या निमित्ताने मेवानी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. जंतरमंतरनजीक संसद मार्गावर होणाऱ्या या रॅलीला दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत परवानगी नाकारल्यामुळे समर्थकांमध्ये प्रश्‍नचिन्ह होते. त्याचा परिणाम रॅलीच्या प्रतिसादावर दिसून आला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. प्रत्यक्षात "जेएनयू'मधील विद्यार्थ्यांसमवेत उपस्थितांची तुरळक संख्या वगळता फारशी गर्दी झालीच नाही. 

पोलिसांकडून रॅलीला झालेल्या विरोधाबद्दल नाराजी व्यक्त करताना मेवानी यांनी सरकारवर हल्ला चढवला. शांततेने आणि लोकशाही पद्धतीने मार्गाने निदर्शने करणाऱ्यांना सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. लोकप्रतिनिधींची अशी मुस्कटदाबी होत असेल तर जनसामान्यांची अवस्था काय असेल, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

व्यासपीठावर "जेएनयू'मधील उमर खालीद, कन्हैया कुमार, सेहला रशीद आदी विद्यार्थी संघटनांचे नेते, आसाममधील शेतकरी नेता अखिल गोगोई, प्रशांतभूषण होते. त्यांचीही भाषणे झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT