Manohar Parrikar
Manohar Parrikar 
देश

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

सकाळवृत्तसेवा

पणजी : मुंबई येथील लिलावती इस्पितळातून हल्लीच उपचार घेऊन गोव्यात आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा रक्‍तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टर त्यांची तपासणी करत आहेत. 

गोव्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबईहून विशेष विमानाने गोव्यात आले होते. गोव्यात पाऊल ठेवताच ते आपल्या खासगी निवासस्थानी गेले. ते विधानसभेत येणार असल्याने पर्वरी विधानसभा संकुलात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती तसेच सर्व मंत्री व आमदारांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती लावली होती. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकही घेतली होती. आजारामुळे त्यांना जास्त वेळ विधानसभेत उपस्थित राहणे शक्‍य नसल्याने काही मिनिटातच त्यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडून ते ताळगाव पठार येथील आपल्या खासगी निवासस्थानी परतले होते. त्यांच्यासोबत मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टर सोबत आले आहेत व त्यांच्या आजारावर नजर ठेवून आहेत. त्यांनी गेल्या शुक्रवारपासून घरामधून सरकारी काम सुरू केले होते व उद्या 26 रोजी सोमवारी पर्वरी सचिवालयातून कामकाज करण्याचे ठरविले होते. आज संध्याकाळी त्यांना अस्वस्थ्य वाटू लागल्याने तपासणीसाठी गोमेकॉ रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासह गोमेकॉ इस्पितळाचे तज्ज्ञ डॉक्‍टर्स त्यांची तपासणी करत होते. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून लवकर बरो व्हावेत यासाठी राज्यभर अनेक ठिकाणी मंदिरामध्ये होम हवन व चर्चमध्ये प्रार्थनाही आयोजित करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT