Narendra Modi
Narendra Modi 
देश

त्यांची 48 वर्षे, आमचे 48 महिने; मोदींचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था

पुद्दुचेरी : मागील चार दशकांपासून एकाच कुटुंबाने देशावर राज्य केले असून, घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विकासाभिमुख सरकार या दोन्ही सरकारांच्या कामगिरीची तुलना लोकांनीच करावी. त्यांची 48 वर्षे आणि आमच्या 48 महिन्यांचा लेखाजोखा तुम्हीच तपासा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे आयोजित सभेत बोलताना केले. 

मोदी म्हणाले, "एकाच कुटुंबाने देशावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 48 वर्षे राज्य केले. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी सतरा वर्षे राज्य केले. पुढे त्यांच्या कन्येने चौदा वर्षे आणि कन्येच्या मुलाने पाच वर्षे राज्यशकट सांभाळला. मागील दहा वर्षांमध्ये एकाच कुटुंबाने रिमोट कंट्रोलच्या साह्याने कशा पद्धतीने देश सांभाळला हे तुम्ही अनुभवलेच आहे.'' 

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मे महिन्यामध्ये 48 महिने पूर्ण होत असल्याचा दाखला देताना मोदी यांनी यापूर्वीच्या कॉंग्रेस सरकारांच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. आज केवळ कॉंग्रेसमुळे पुद्दुचेरीतील पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकला नाही. कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्येही आमचा पक्ष विजयी होणार असून, कॉंग्रेसचे अस्तित्व केवळ पुद्दचेरीपर्यंतच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी असून मिझोराम, मेघालय आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमचाच पक्ष विजयी होईल. हरियाना आणि महाराष्ट्रामध्येही आम्ही विजयी होऊ शकतो. परिस्थिती आता बदलत असून लोकांना कॉंग्रेस पक्षच हवा आहे. 
व्ही. नारायणसामी, मुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT